- दुबई, हाँगकाँगमधील आंतरराष्ट्रीय टोळीशी कनेक्टेड आठ जण अटकेत…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १४ नोव्हेंबर २०२४) :- शेअर मार्केट ट्रेडिंगमध्ये गुंतवणुकीच्या बहाण्याने जेष्ठ नागरिकाची ऑनलाईन ९९,००,०००/ रुपयांची फसवणुक करणाऱ्या आंतरराष्ट्रीय टोळीशी संपर्कात असलेला व दुबई येथिल बँकेत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यासह एकुण ०८ आरोपींना सायबर पोलीसांकडुन अटक करण्यात आली असून ऑनलाईन फसवणुकीच्या गुन्ह्याची उकल करण्यात आली आहे.
रहाटणी काळेवाडी येथे राहणाऱ्या जेष्ठ नागरीकास ऑनलाईन ट्रेडींग करण्यासंर्दभात अनोळखी इसमाने लिंक पाठवुन व्हॉटसअप ग्रुपमध्ये अॅड केले. त्यानंतर CAUSEWAY नावाचे अॅप डाउनलोड करण्यास सांगुन त्यामध्ये गुंतवणुकीचे रोज दोन टास्क देऊन ते टास्क पूर्ण केल्यास ३०० टक्के पर्यन्त नफा देण्याचे अमीष दाखवुन विश्वास संपादन करून केला होता. त्यात ९९,००,०००/- रुपयांची फसवणुक झाल्याने सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
तपासा दरम्यान आरोपी यांनी गुन्हयासाठी वापरलेल्या बँक अकाऊंटपैकी एक बँक अकाऊंट हे मुंबई येथील असल्याबाबत माहिती मिळाली. पोलीस पथकाने तयार करुन अकाऊंटधारकाने बँक अंकाउट हे त्याचा मामा महादेव कटके याच्या सांगण्यावरुन काढले हे अंकाउट संपुर्ण किटसह त्याचेकडे दिले असल्याचे सांगितले. त्याबाबत अधिक तपास केला असता महादेव कटके याचा शोध घेवुन त्याच्याकडे तपास करता त्याने या अकाऊंटसह इतर बँक अकाऊंट हे आरोपी मसुद आलम व सागर भोसले यास दिले असल्याचे सांगितले.
त्याप्रमाणे अधिक तपास व तांत्रिक विश्लेषणाद्वारे तपास करुन मुंबई येथुन संशयीत आरोपी १) महादेव ऊर्फ मधुकर गंगाधर कटके वय ४४ वर्षे रा. कामोठे, नवी मुंबई, २) मसुद आलम सिद्दीकी वय ४८ वर्षे रा. लोढा बी विंग जोगेश्वरी पश्चिम मुंबई. ३) मोहम्मद अफझल सलमानी वय ४९ वर्षे रा. गोरेगाव वेस्ट, मुंबई, ४) तौसिफ जैनुद्दिन सैय्यद वय- ४० वर्षे रा. इरानी कॉलनी, मालाड पुर्व, मुंबई यांना अटक करुन त्यांचे पुढील साथीदार ५) सागर ब्रम्हदेव भोसले, वय ३८ वर्षे रा. लासुर्णे, ता. इंदापुर, जि. पुणे, ६) इम्रान मोहम्मद हसन सय्यद वय ४४ वर्षे रा. कळया, ठाणे, ७) प्रणव प्रविण दळवी वय ३० वर्षे रा. बोरीवली ईस्ट, मुंबई ८) दानिश दिलावर साठी वय २४ वर्षे रा. देवीपाडा रोड, मुंब्रा, ठाणे यांना मुंबई येथे जावुन सापळा रचुन अटक करण्यात आली आहे.
प्राथमिक तपासामध्ये आरोपी दानिश दिलावरसाठी हा दुबई येथील अबुधाबी बँकेमध्ये तीन वर्षापासुन स्थायी कर्मचारी असुन दुबई येथील त्याचे साथीदाराचे सांगण्यावरुन तो भारतात येवुन साथीदारांचे मदतीने सदरचे गुन्हे करीत असल्याचे दिसुन आले आहे. तसेच आरोपी प्रणव दळवी हा टेलिग्रामच्या माध्यमातुन हाँगकाँग येथील इसमास बँक अकाऊंट विक्री करीत असल्याची माहीती मिळून आली आहे.
तपासामध्ये आरोपीकडुन एकुण १३ मोबाईल, वेगवेगळे बँक अकाऊट, किट इत्यादी असा १,२०,०००/- रु. चा मुद्देमाल जप्त करण्यात आला असुन ७ लाख रुपये वेगवेगळया बँक अकाऊंटवर होल्ड करण्यात आले आहेत. आरोपींना अटक करण्यात आली असुन त्यांची दि. १६/११/२०२४ पर्यंत पोलीस कोठडी मंजुर आहे. आरोपी यांचे दुबई, हाँगकाँग येथिल आंतरराष्ट्रीय टोळीबरोबर संबध असल्याचे प्राथमिक तपासामध्ये दिसुन आले आहेत, आरोपी यांचेकडे एकुण ३६ बँक अकाऊंटची माहीती मिळुन आली असुन त्यावर संपुर्ण भारतात एकुण २७ पोर्टलच्या तक्रारी दाखल असल्याची माहीती प्राप्त झाली आहे. तसेच आरोपी याने गुन्हयासाठी वापरलेले बँक अकाऊंटवर २.६८ कोटी रुपयांचे व्यवहार मिळुन आहेत. त्याअनुषंगाने सखोल तपास चालु आहे. दाखल गुन्हयाचा अधिक तपास पोलीस निरीक्षक रविकिरण नाळे हे करीत आहेत.
नागरीकांना आवाहन…
शेअर मार्केटमध्ये गुंतवणुक करणेसाठी सेबी पुरस्कत अॅप्लीकेशनचा वापर करावा. शेअर मार्केट गुंतवणुक करण्यासाठी सेबी पुरस्कत अॅप्लीकेशन हे वेगवेगळया खात्यांमध्ये पैसे भरण्यास सांगत नाहीत. शेअर मार्केटमध्ये गुंतवणुक करताना आपण बनावट प्लॅटफार्मवर गुंतवणुक करत नाहीत ना याची खात्री करावी. कोणत्याही परिस्थितीत आपला मोबाईल स्क्रिन, बैंक अकाऊंट, वैयक्तीक माहीती शेअर करु नये.
















