- यासाठी मला निवडून द्या – जावेद शहा…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १६ नोव्हेंबर २०२४) :- भारत देश संविधनावर उभारलेला आहे. हे संविधान सर्वधर्म समभाव शिकवते. पण काही लोक या संविधनाला मानत नाहीत, हेच संविधान देशाचा आत्मा आहे. तो आत्मा वाचला पाहिजे. यासाठी मला निवडून द्या, असे आवहान स्वराज्य शक्ति सेनेचे भोसरी विधानसभेचे अधिकृत उमेदवार जावेद शहा यांनी मतदारांना केले आहे.
नेहरूनगरमध्ये मतदारांच्या गाठीभेटी व प्रचार फेरी दरम्यान जावेद शहा मतदारांशी संवाद साधत होते. यावेळी बहुसंख्य मुस्लिम समाजांनी व इतर समाजांनी धर्मनिरपेक्ष भुमिका घेऊन संविधान जागरणासाठी आणि ज्याची त्याची संस्कृती जपण्यासाठी मैदानात उतरलेल्या जावेद शहा यांच्या धाडसी भुमिकेचे कौतुक करून त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याचे आश्वासन दिले जात होते.
शहरात मुस्लिम समाजातील नेत्वृत्वाचा अभाव...
मतदार संघात मुस्लिम समाजाची दशा झाली असून याला या मतदारसंघातील सर्वच प्रमुख पक्षांचे नेते मंडळी कारणीभुत आहेत. ही परस्थिती बदलण्यासाठी संविधान प्रेमी मुस्लिम व दलित समाजांनी मला निवडून द्यावे. माझे निवडणूक चिन्ह ‘हिरा’ असून या चिन्हासमेरील बटन दाबून मला निवडून द्यावे. – जावेद शहा, उमेदवार – भोसरी विधानसभा मतदारसंघ…
















