न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपळे सौदागर (दि. १६ नोव्हेंबर २०२४) :- उन्नती सोशल फाऊंडेशन , वेंसर हॉस्पिटल आणि ऑल सिनिअर सिटीझन असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने शिख धर्माचे संस्थापक , आद्य गुरू आणि मानवतावादी शिकवण देणारे संत गुरुनानक भगवान यांच्या जयंतीनिमित्त आरोग्य शिबिर संपन्न झाले.
या शिबिरात उंची , वजन , ब्लड प्रेशर , ECG हृदयाचा आलेख , ब्लड शुगर , हाडांची घनता , नेत्ररोगतज्ञ यांच्या मार्फत नेत्रदोष तपासणी विनामूल्य करण्यात आली. तसेच , एक्स रे मध्ये ३० % सूट , पॅथॉलॉजी लॅब टेस्ट मध्ये २०% सूट , डेक्सा स्कॅन मध्ये २० % सूट देण्यात आली. पिंपळे सौदागर आणि परिसरातील सर्व वयोगटातील नागरिकांनी या मोफत आरोग्य तपासणी शिबिराचा लाभ घेतला. वेंसर हॉस्पिटल तर्फे डॉ.समीर पाटील (ऑर्थोपेडिक) , डॉ शरून शितोळे , डॉ.शैलेश तारू (व्यवस्थापक ), नितीन पंडित (व्यवस्थापक) या वैद्यकीय टीमने या शिबिरात सहभाग घेतला.
या उपक्रमाविषयी अधिक माहिती देताना उन्नती सोशल फाउंडेशनच्या अध्यक्ष डॉ.कुंदाताई संजय भिसे म्हणाल्या की , “धकाधकीच्या जीवनात आरोग्य चाचणी ही अत्यंत अत्यावश्यक बाब आहे. बऱ्याच वेळा आपण सर्व काही ठीक असल्याचे समजून , आरोग्य चाचणी करण्याचे टाळतो. मात्र ; आपण नियमितपणे आरोग्य चाचणी केल्यास आपल्याला होणाऱ्या संभाव्य आजारांची माहिती लवकर मिळून , त्याविषयीची उपचार आपल्याला सुरू करता येतात. त्यामुळे उन्नती सोशल फाउंडेशन , वेंसर हॉस्पिटल आणि ऑल सिनिअर सिटीझन असोसिएशन यांच्या सहकार्याने आपण विनामूल्य आरोग्याचा शिबिर घेत आहोत.”
याप्रसंगी , डॉ सुभाषचंद्र पवार, सखाराम ढाकणे, रमेश वाणी सुभाष पाटिल , अशोक येळमकर , यांच्यासह उन्नती सोशल फाऊंडेशनचे सर्व सदस्य , विठाई वाचनालयाचे सदस्य , जेष्ठ नागरिक संघाचे सदस्य , ऑल सिनिअर सिटीझन असोसिएशनचे सदस्य , लिनिअर गार्डन ज्येष्ठ नागरिक संघाचे सदस्य आणि पिंपळे सौदागर मधील नागरिक , पदाधिकारी , कार्यकर्ते आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
















