- आंबेडकरी वर्गाचा स्वाभिमान जागवण्यासाठी मला विजयी करा…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १६ नोव्हेंबर २०२४) :- भोसरी विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय अपक्ष उमेदवार हरीश उर्फ भाऊसाहेब डोळस यांनी आज नेहरुनगर, विठ्ठलनगर, घरकुल वसाहत, अजमेरा, यशवंतनगर या ठिकाणी प्रचार फेरी काढून येथील मतदारांना आंबेडकरी जनतेचा आवाज प्रस्थापित पुढाऱ्याकडून दाबण्याचा प्रयत्न केला जात आहे, आपला स्वाभिमान जागृत व टिकवण्यासाठी आंबेडकरी जनतेने माझ्या पाठीशी राहून संगणक या चिन्हा समोरील बटन दाबून मला प्रचंड मतानी विजयी करावे, असे आवाहन केले.
यावेळी अनेक नागरीकांनी परिसरातील अस्वच्छता तसेच रस्त्यावरील अतिक्रमण आणि बेशिस्त वाहतुक रहदारी या बाबत हरिश उर्फ डोळस यांच्याकडे तक्रारी करुन येथील नागरीकांचे आरोग्य धोक्यात आले असल्याच्या अनेक तक्रारी केल्या. तर ही सर्व परस्थिती बदलायची असेल तर मला प्रचंड मतानी निवडून द्या असे आवहान डोळस यांनी केले.
नेहरुनगर परिसरातील नागरीकांच्या अनेक समस्या…
नेहरुनगर हा सर्वसामान्य नागरीकांची मोठी वसाहत आहे. याठिकाणी सर्वात जास्त मुस्लिम व एसी समाजातील लोक राहत आहेत. पण या दोन्ही समाजाकडे नेहमीच प्रस्थापित राजकारणी वर्गाने दुर्लक्ष केले आहे. हे येथील समस्यावरुन लक्षात येते. येथीलच नाहीत तर भोसरी विधानसभेतील सर्वच समस्या दुर करण्यासाठी मतदारांनी माझ्या संगणक या चिन्हा समोरील बटन दाबून विजयी करावे.
– हरिश उर्फ भाऊसाहेब डोळस, अपक्ष उमेदवार भोसरी विधानसभा.
















