- बंदोबस्तावरील पोलीस कर्मचाऱ्यासह अधिकाऱ्याला नेलं रस्त्यावरून फरफटत..
- एसएसटी पथकाच्या कामात अडथळा; सरकारी बॅरीकेटचेही नुकसान…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १६ नोव्हेंबर २०२४) :- जुन्या मुंबई-पुणे हायवेवरील निगडी भक्ती शक्ती चौक येथील मुख्य रस्त्यावर विधानसभा निवडणुकीच्या बंदोबस्तासाठी एसएसटी पथकाचे अधिकारी आणि कर्मचारी बॅरीकेट लावुन वाहन तपासणीचे काम करीत आहेत.
दरम्यान (दि. १५) रोजी रात्री ००.२५ वा. चे सुमारास पुण्याकडे जाणारी कार (एम.एच.१२.एच. एन.२४५८) या वाहनावरील चालकाने वाहन भरधाव वेगात वाहतुकीच्या नियमांकडे दुर्लक्ष करुन चालविले. वाहनास तपासणी करण्यासाठी वाहन थांबविण्याचा हाताने इशारा केला असता कार चालकाने त्याच्या ताब्यातील कार न यांबाविता बॅरीकेटला धडक देवून पथकातील पोलिस कर्मचाऱ्याला बॅरीकेटसह रस्त्यावर २० फुटापर्यंत फरफटत नेले. तसेच एसएसटी पथक प्रमुख यांना जखमी केले. सरकारी बॅरीकेटचेही नुकसान करुन सरकारी कामात अडथळा निर्माण करत घटना स्थळावरून पळून गेला आहे.
याप्रकरणी आरोपी एम.एच.१२.एच.एन. २४५८ यावरील वाहन चालक (नाव पत्ता माहित नाही) याच्या विरोधात निगडी पोलीस ठाण्यात ५४५/२०२४ बी.एन.एस. कलम-१३२, १२१(१),२८१,१२५ (अ),३२४ (४), सह मो.वा. कायदा कलम १८४, ११९/१७७ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोउपनि यलमार पुढील तपास करीत आहेत.
















