- हरीश उर्फ भाऊसाहेब डोळस यांचा भोसरीतील सत्ताधाऱ्यांना सवाल…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. 18 नोव्हेंबर 2024) :- भोसरीतील अनेक मागासवर्गीय तुरुणांना आजही शाश्वत रोजगारासाठी कोणत्याच कंपन्यामध्ये स्थान नाही. आज एकीकडे सत्ताधारी संविधान भवन उभा करत असताना दिसत आहेत. तर ज्यांना आमदारांची स्वप्ने पडत आहेत अशा दोन्ही प्रस्थापित वर्गांनी कधी मागसवर्गीयांच्या खऱ्या समस्या जाणून घेतल्या का, त्यांना रोजगार दिले का असा खडा प्रश्न भोसरीचे अपक्ष उमेदवार हरीश उर्फ भाऊसाहेब डोळस यांनी भोसरीतील दोन्ही उमेदवारांना विचारला आहे.

आज भोसरीतील विकास असेल रोजगार असेल हा फक्त काही जाती पुरताच मर्यादित ठेवला गेला असून, अन्य जातींना या विकासामध्ये रोजगाराच्या संधीमध्ये कुठेही स्थान नाही. अशांना आम्हांला मते मागण्याचा अधिकार आहे का? हा प्रश्न त्यांनी प्रथम स्वत:च्या मनाला विचारावा, असा प्रश्न हरीश उर्फ भाऊसाहेब डोळस यांनी पुढील दोन्ही प्रमुख पक्षाच्या उमेदवारां पुढे उपस्थित केला आहे.
मतदारांनी माझ्या ‘संगणक’ चिन्हा समोरील बटन दाबून मलाच मतदान करावे, असे आवाहन देखील डोळस यांनी मतदारांना केले आहे.
या परिसरातील मतदारांच्या घेतल्या गाठी भेटी…
भोसरी मतदारसंघातील तापकीर नगर, घऱकुल, रुपीनगर, सहयोगनगर, ओटा स्किम निगडी, परीसरातील मतदारांची डोळस यांनी भेटी घेऊन विकासाची भुमिका मांडली. या परिसरातील अनेक नागरीकांना वाहतुकीच्या समस्यांना सर्वात जास्त सामोरे जावे लागत असल्याचा सुर प्रचार फेरी दरम्यान मतदारांनी डोळस यांच्या पुढे काढला. तसेच शाश्वत विकासा बद्दल व नव्या उमेदवाराबद्दल देखील नागरीकांनी अनेक नकारात्मक मते व्यक्त केली. यामुळे भोसरीतील व दिघीमधील मतदार माझ्याच सोबत राहतील, असा विश्वास देखील हरीश उर्फ भाऊसाबेह डोळस यांनी व्यक्त करुन माझ्या ‘संगणक’ चिन्हा समोरील बटन दाबून मलाच विजयी करण्याचे आवाहन त्यांनी केले.
















