- पिंपळे निलखच्या विशालनगर येथील मतदान केंद्रावरील घटना…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २१ नोव्हेंबर २०२४) :- पिंपळे निलखच्या विशाल नगर येथील विदया विनयनिकेतन शाळेच्या मतदान केंद्र क्रमांक ४७४ या मतदान बुथवर प्रिसायडिंग ऑफीसर म्हणुन फिर्यादी हे कर्तव्य करीत होते. आरोपीने येथे स्वतःचे मतदान करताना, बॅलेट युनिट व व्हीव्हीपीएटी यांचे फोटो काढले.
बॅलेट युनिट वरील अ.क्रं. १ वरील ‘तुतारी वाजविणारा माणुस’ या निशाणीवर बटन दाबुन मत टाकल्याची तशी स्लिप व्हीव्हीपॅट मध्ये दिसुन आली. सदरचे फोटो व व्हिडीओ हे त्याने स्वतःच्या इन्स्टाग्राम अकाऊंट martinswamy3033 या इंस्टाग्राम अॅपवर स्टोरी ठेवुन प्रसारित केली. मतदान प्रक्रियेच्या गोपनियतेचा भंग केला व निवडणुक आयोगाने दिलेल्या निर्देशांचे उल्लंघन केले.
हा प्रकार (दि. २०) रोजी सकाळी ११:१५ वा. चे सुमारास घडला. याप्रकरणी नरेंद्र वसंतराव देशमुख (मतदान अधिकारी) यांनी आरोपी मार्टिन जयराज स्वामी (वय २५ वर्षे, हिंद चौक, विशालनगर, पिंपळे निलख) याच्या विरोधात फिर्याद दिली आहे.
सांगवी पोलिसांनी ४८०/२०२४, भारतीय न्याय संहिता कलम २२३, सह लोकप्रतिनिधी कायदा १९५१ चेकलम १२८, १३१(१) सह निवडणुकनियम १९६१ कलम ४९ (एम) नुसार गुन्हा दाखल करीत आरोपीला अटक केली आहे. पुढील तपास पोनि चेवले करीत आहेत.

















