न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २१ नोव्हेंबर २०२४) :- कंपनीतील कामावरुन सुट्टी झाल्यावर बसमध्ये बसण्यास जात असताना ‘तुला लाईनवर बाया पाहिजेत काय?’ असे विचारत खाली जमिनीवर पाडुन लाथाने आणि हाताने फिर्यादीला मारहाण केली. मारहाणीत फिर्यादीच्या डोक्याच्या पाठीमागील बाजुस व ओठास गंभीर जखम झाली. तोंडातील वरील बाजुचा समोरील एक दात साधारण तुटला आहे, असं फिर्यादीत नमूद आहे.
हा प्रकार (दि. १९) रोजी रात्री ११:१५ वा सुमारास महाळुंगे इंगळेतील अॅप्टीव्ह कंपनीच्या आवारात व इनगेट समोर घडला. फिर्यादी मनमत शंकर आनेराये (वय २५ वर्ष, नोकरी, राहणार बालाजीनगर, मेदनकरवाडी) यांनी आरोपी १) मोटार सायकल नंबर एम एच १४/एल.क्यु/०६२८ वरील तोडास रुमाल बांधलेले २५ ते ३० वयोगटातील दोघेजन. २) स्प्लेडर मोटार सायकलवरील दोन अनोळखी इसम यांच्या विरोधात फिर्याद दिली आहे.
महाळुंगे एमआयडीसी पोलिसांनी ७९६/२०२४, भा.न्या.सं. कलम ११७ (२), ३५२, ३५१(२) प्रमाणे आरोपींच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोहवा लोखंडे पुढील तपास करीत आहेत.

















