- मतमोजणी प्रक्रिया शांततेत व सुरळीत होण्यासाठी मोठा फौजफाटा तैनात…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २२ नोव्हेंबर २०२४) :- महाराष्ट्र राज्य सार्वत्रिक विधानसभा निवडणूक २०२४ ची मतमोजणी प्रक्रिया २३ नोव्हेंबर २०२४ रोजी होणार आहे. त्यासाठी पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय हद्दीत एकूण तीन ठिकाणी स्ट्राँगरूम व मतमोजणी केंद्राची उभारणी करण्यात आली आहे. त्यासाठी पिंपरी चिंचवड पोलीसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
मतमोजणी प्रक्रिया शांततेत व सुरळीत पार पाडण्याकरिता ०१ पोलीस सह आयुक्त, ०१ अपर पोलीस आयुक्त, ०४ पोलीस उप आयुक्त, ०५ सहायक पोलीस आयुक्त, २९ पोलीस निरीक्षक, ६४ सपोनि/पोउपनि, ६५६ पोलीस अंमलदार, १ राज्य राखीव दलाची कंपनी, ०४ केंद्र सुरक्षा दलाच्या कंपनी, ०१ हरियाणा पोलीस कंपनी एवढा मोठा फौजफाटा बंदोबस्ताकामी तैनात करण्यात आलेला आहे.
ही आहेत मतमोजणी केंद्र…
१) २०४ मावळ विधानसभा, नूतन कॉलेज ऑफ इंजिनिअरींग तळेगाव दाभाडे, पुणे
२) २०५ चिंचवड विधानसभा, पिंपरी चिंचवड मनपा कर्मचारी महासंघ संचलित स्वः शंकर (आण्णा) गावडे स्मृती कामगार भवन, थेरगाव, पुणे
३) २०६ पिंपरी विधानसभा व २०७ भोसरी विधानसभा, श्री. शिव छत्रपती क्रिडा संकुल बालेवाडी, पुणे

















