न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १३ मे २०१९) :- छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त संभाजीनगरमधील बर्ड व्हॅली येथे फटाक्यांची आतषबाजी आणि मशाल रॅलीचे आयोजन करण्यात आले.
आज सोमवारी (दि. १३) रोजी सायंकाळी साडेसहा वाजता हा कार्यक्रम होणार आहे. शिवजन्मोत्सव समितीच्या वतीने या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाला सर्व नागरिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन समितीच्या वतीने करण्यात आले आहे.















