न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १३ मे २०१९) :- हिंजवडी येथील एका बांधकाम साइटवरून चोरट्यांनी पावणेदहा लाखांचे इलेकॉनिकचे साहित्य चोरून नेले. ही घटना शुक्रवारी (दि. १०) रोजी सकाळी नऊच्या सुमारास उघडकीस आली.
याप्रकरणी नितीन भाऊराव तरंगे (वय ४०, रा. वारजे) यांनी हिंजवडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हिंजवडी फेज दोन येथे एक बांधकाम साइट सुरू आहे. चोरट्यांनी साइटवर पत्र्याच्या शेडमध्ये ठेवलेले वायर, एमसीबी व आरसीसीबी असे ९ लाख ८८ हजार ७०२ रुपयांचे साहित्य चोरून नेले. पुढील तपास हिंजवडी पोलिस करीत आहेत.















