न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १३ मे २०१९) :- पोलिस कर्मचा-यांशी हुज्जत घालून त्यांच्या गाडीची काच फोडणा-या तिघांना अटक करण्यात आली आहे. ही घटना शुक्रवारी (दि. १०) रोजी रात्री साडेदहाच्या सुमारास निगडी प्राधिकरण येथे घडली.
राहुल प्रल्हाद पाटील (वय २५), शुभम प्रल्हाद पाटील (वय २७), अमित शांतीलाल पाटील (२७, सर्व रा. वाल्हेकरवाडी, चिंचवड) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेचे पोलिस हवालदार शकूर मोहम्मद फकिर मोहम्मद तांबोळी यांनी फिर्याद दिली आहे.















