न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २६ नोव्हेंबर २०२४) :- पिंपरी चिंचवडमधील आमदार महेश लांडगे यांच्या कार्यकर्त्यांनी भोसरीच्या विजयाचा जल्लोष मध्यप्रदेश येथील महेश्वर याठिकाणी साजरा केला.
भोसरी विधानसभेत तिसऱ्यांदा सर्वाधिक मताधिक्याने लांडगे निवडून आले. त्यावेळी सर्व कार्यकर्ते चिखली गावातील ७५० यात्रेकरूंना घेऊन उज्जैन, महेश्वर, ओंकारेश्वर येथे धार्मिक यात्रेला गेले होते.
२० नोव्हेंबला मतदान करून यात्रेस निघालो. २३ नोव्हेंबरला निकालाच्या दिवशी राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या राजधानीत महेश्वर याठिकाणी होतो. हॅट्रिकची बातमी समजताच कार्यकर्त्यांनी अभिनंदनचे फ्लेक्स आणले. आमदार महेश लांडगे यांची हॅट्रिक होताच सर्व यात्रेकरुनी तसेच जितूभाऊ यादव मित्र परिवाराच्या वतीने जल्लोष केला.
















