न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २६ नोव्हेंबर २०२४) :- ”बायकोला सरपंच पद मिळाले नाही” या रागातून फिर्यादीच्या डोळ्याच्या भुवईवर व तोंडावर बिअरची बाटली फोडली. त्यामुळे गंभीर दुखापत झाली. शिवीगाळ आणि जिवे मारण्याची धमकी दिली. तसेच चारचाकी गाडीने फिर्यादीच्या दुचाकीला ठोकरुन तिचे नुकसान केले.
हा प्रकार (दि.२४) रोजी दुपारी ०४/०० वा. चे. सुमारास खेड तालुक्यातील आहिरे गावात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ घडला. याप्रकरणी नारायण रामचंद्र अहेरकर (वय-५५ वर्षे) यांनी आरोपी नितीन सखाराम तांबे (रा. आहिरे ता. खेड जि. पुणे) याच्या विरोधात फिर्याद दिली आहे.
महाळुंगे एमआयडीसी पोलिसांनी ८०२/२०२४ भारतीय न्याय संहिता २०२३ चेकलम ११८ (१), ३५२, ३५१ (२), ३२४ (४) प्रमाणे गुन्हा दाखल करीत आरोपीला अटक केली आहे. पोहवा दिघे पुढील तपास करीत आहेत.
















