न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २७ नोव्हेंबर २०२४) :- फॉईल पेपरची फॅक्टरी नुकसानीत गेली. त्याला फिर्यादीच्या पतीस कारणीभुत ठरवले. त्यावरून वारंवार जिवे ठार मारण्याची त्यांना आरोपीने धमकी दिली. फिर्यादीचे पती कामावर जाण्यासाठी घराबाहेर निघाले असता आरोपीने त्यांना गाठले. हातामधील लोखंडी कु-हाड डोक्यावर, खांद्यावर मारून करुन त्यांना जीवे ठार मारले आहे.
हा प्रकार (दि. २६) रोजी ११.४५ वा.चे सुमारास फिर्यादीच्या राहत्या घरासमोर गेलार्ड चौक, पिंपरी येथे घडला. याप्रकरणी महिला फिर्यादी यांनी आरोपी रामचंद गोपीचंद मनवानी (वय ४६ वर्षे, रा. गुरुकृपा निवास, पिंपरी) याच्या विरोधात फिर्याद नोंदविली आहे.
पिंपरी पोलिसांनी १०६८/२०२४ भारतीय न्याय संहिता कलम १०३, ३५१(३) प्रमाणे गुन्हा दाखल करीत आरोपीला अटक केली आहे. सपोनि लोहार पुढील तपास करीत आहेत.












