- शिरगाव पोलिसांच्या कारवाईमुळे पुढील अनर्थ टळला..
- दहा जणांच्या विरोधात गुन्हा दाखल…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २७ नोव्हेंबर २०२४) :- आयशर कंपनीच्या चार ट्रकमधून अनधिकृतपणे म्हशीची वाहतूक केली. त्यासाठी चारा पाण्याची सोय केली नाही. त्यांना दाटीवाटीने तसेच वाहतुक परवानाविना एकुण ४,४६,५००/-रु. किं. च्या ९५ म्हशी व रेडके यांना छळ व वेदना होईल याप्रमाणे त्यांची वाहतुक करीत कत्तलीकरीता नेत असताना पोलिसांच्या निदर्शनास आले.
हा प्रकार (दि. २६) रोजी पहाटे ०३.१६ ते ०३.२० वा दरम्यान मावळातील उर्से टोल या लेन नाका येथील एक्सप्रेस हायवे मुंबईकडे जाणाऱ्या बाजूकडे घडला.
याप्रकरणी आरोपी १. हैदर बिलाल शेख, वय ३१ वर्षे, धंदा चालक, रा. म्हाडा कॉलनी, शिवाजीनगर, गोवंडी, चेंबूर, बि.नं.१८ रुम नं.७०७ मुंबई, २. रफिक महम्मद कुरेशी, वय २१ वर्षे, रा. कुर्ला, मुंबई ३. इमरान अहमद कुरेशी, वय ३२ वर्षे, धंदा चालक, रा. कुर्तासहारा रहिवाशी मुंबई ७० ४. अरबाज अब्दुल कुरेशी, वय २० वर्षे, रा. कुर्ला, मुंबई पुर्ण पत्ता माहीत नाही. ५. काशिम नाशिर, वय ३८वर्षे, धंदा चालक, रा. बुलंदशहर गाझीयाबाद, कसबा बुकराशी, तहसील सियाना, राज्य उत्तर प्रदेश ६. मोहम्मद बसीम कुरेशी, रा. दोलमपुर कला, युनूसपुर, ठाणा नरसेना, बुलंदशहर उत्तर प्रदेश इंतीयाज खान यांचे भाडयाचे खोलीत प्लॉट नं ३, रुम नंबर ५०४, दुर्गा सेवा, गोवंडी मुंबई ७. दिपक सोनाजी बावस्कर, वय ४७ वर्षे, धंदा चालक, रा. रवी सुरवाडे यांचे भाडयाचे खोलीत नवीन गैतमनगर, पी.एल. लोखंडे मार्ग, गोवंडी मुंबई ८. खलील कासीम कुरेशी, रा. रुम नंबर १४, बरमा सील रेल्वे लाईन, इंदीरानगर कुर्ला ईस्ट मुंबई ९. रफिक बेपारी, १०. हुसैन बेपारी (दोघे रा. कल्याण, मुंबई पुर्ण पत्ता माहीत नाही) यांच्या विरोधात शिरगाव पोलीस ठाण्यात २६७/२०२४ प्राणी छळ प्रतिबंधक अधिनियम चे १९६० ११(१) बी.एन.एस. २०२३ चे ३(५) मोटार अधिनियम १९८८ चे १७७, ८० प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोउपनि शेख पुढील तपास करीत आहेत.












