- काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं पत्रकार परिषदेत स्पष्टीकरण..
- गुरुवारी दिल्लीतून होणार मुख्यमंत्री पदाची घोषणा…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २७ नोव्हेंबर २०२४) :- काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज बुधवारी माध्यमांशी संवाद साधला. आमच्याकडून कुठेही घोड आडलेल नाही. मोदी साहेबांनी काल फोन केला होता. सरकार बनवताना माझ्यामुळे अथवा कोणामुळे अडचण असेल तर मला सांगा. देशात एनडीए महाराष्ट्रात महायुती म्हणून तुम्ही निर्णय घ्या. तो निर्णय आम्हाला मान्य असेल. सत्तास्थापनेसाठी आमच्यामुळे कोणतीही अडचण नसेल. मी काहीही ताणून ठेवलेले नाही. अमित शहांनाही माझ्या भावना सांगितल्या. आमची कुठलीही नाराजी नाही. मोदिसाहेब आणि शहासाहेब निर्णय घेतील त्याला आमचा आणि शिवसेनेचा पाठींबा राहील, असे ते म्हणाले. गुरुवारी अमित शहा यांच्या उपस्थितीत बैठक होणार आहे. त्यात मुख्यमंत्री पदाची घोषणा होणार आहे.
निवडणूक निकालानंतर ते बरेच दिवस माध्यमांसमोर आले नव्हते. ते नाराज असल्याची चर्चा होती. दरम्यान, आज त्यांच्या ठाण्याच्या निवासस्थानी पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलं होत. तिथे त्यांनी महायुती सरकारबाबत आश्वासक माहिती दिली. त्यामुळे आता देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि आमित शहा यांना मुख्यमंत्रीपदाचा तिढा सोडवा लागणार आहे.
यावेळी माध्यमांशी प्रतिक्रिया देताना काळजीवाहू मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, महायुतीने मोठा विजय मिळवला आहे. विकास आणि कल्याणकारी योजनांची सांगड घातली. मविआने थांबविलेले काम युतीने पुढे नेली. पायाला भिंगरी लावून कार्यकर्त्याप्रमाणे काम केले. मी कार्यकर्ता होतो आहे आणि राहीन. सीएम म्हणजे कॉमन मेन हे मी सिद्ध केलं. पहाटेपर्यंत काम केल. सोन्याचा चमचा घेऊन आलेल्याना हे कळणार नाही. नाव न घेता उद्धव ठाकरेंना यांनी टोमणा हाणला. मोदींनी माझ्यावर विश्वास ठेवला. अडीच वर्षे मोदी पहाडासारखे माझ्या मागे उभे राहिले. मोदी आणि शहा यांना खूप खूप धन्यवाद. अडीच वर्षातल्या कामगिरीने मी समाधानी आहे. राज्याला एक नंबरला नेण्याचं काम आम्ही केल. विकासकामांमुळे आमच्यावर मतांचा वर्षाव झाला. १२४ सिंचन प्रकल्पांना मान्यता मिळाली. आम्ही नाराज नाही तर लढून काम करणारे आम्ही लोक आहोत. लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ हि ओळख निर्माण झाली. मविआ च्या काळात तीन नंबर वर गेलेलं राज्य अव्वलस्थानी आणले. रक्ताचा शेवटचा थेंब असेपर्यंत महाराष्ट्रासाठी काम करेन. माझ्यापेक्षा लोकांना काय मिळाल हे महत्वाच. राज्याला पुढे न्यायचं असेल तर केंद्राकडे जावे लागते.












