न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १३ मे २०१९) :- ड्रेनेज लाईन तुंबल्याने बालाजीनगर झोपडपट्टीमधील संत निरंकारी भवनाच्या पाठीमागील सुमारे ऐंशी घरांमध्ये शनिवारी (दि. ११) रोजी मध्यरात्रीच्या सुमारास ड्रेनेजचे पाणी घुसले.
दुर्गंधीयुक्त पाणी रात्रीच्या वेळी घरात शिरल्याने नागरिकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला. अचनाक घरात पाणी शिरल्याने अनेक घरातील संसारोपयोगी वस्तूंचे नुकसान झाले. दुर्गंधी सुटल्याने अनेकांनी चक्क रस्त्यावर जागून रात्र काढावी लागली.
ड्रेनेज तुंबल्याने घरातून पाणी काढणे देखील नागरिकांना शक्य झाले नाही. दुर्गंधीयुक्त पाणी घरात शिरल्याने नागरिकांचा आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. पालिकेच्या जलनिस्सारण विभागास कळवूनही पालिकेचे कर्मचारी लवकर न आल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.















