न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १३ मे २०१९) :- पुणे महानगर परिवहन महामंडळाकडून (पीएमपी) प्रवाशांना दिला जाणारा पीएमपीचा कागदी मासिक पास आता मी-कार्ड (स्मार्ट कार्ड) स्वरुपात येणार आहे.
याबाबत पुणे महानगर परिवहन महामंडळाकडून पुणे व पिंपरी चिंचवड येथील सर्व पीएमपीच्या पास केंद्रावर याबाबत सूचना देण्यात आल्या असून, येत्या १ जून २०१९ पासून मासिक पास ‘मी कार्ड’ स्वरुपात मिळणार आहे.















