- दोघांच्या विरोधात चिंचवड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. 29 नोव्हेंबर 2024) :- चॅप्टर केसमध्ये खोटा जामीनदार दिल्याची खळबळजनक घटना घडली आहे.
आरोपी क्रमांक एक याचा जामीन हवा म्हणून त्याने आरोपी क्रमांक दोन याचे खोटे नाव व पत्ता बदलून त्याला जामीनदार म्हणून न्यायालयापुढे उभे केले. त्याच्या नावाचे बनावट कागदपत्रे बनवून पोलीसांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार (दि.२८) रोजी दुपारी २.१० वाजताच्या सुमारास पोलीस उप आयुक्त, परिमंडळ ०१ कार्यालय, पिंपरी चिंचवड शहर येथे घडला आहे.
याप्रकरणी आरोपी १) शुभम अशोक मडीवाळ (वय १९ वर्षे, हडपसर), २) विकास कृष्णा माने (वय २८ वर्षे, माने वस्ती नांदुरे, पो. जांभुड, ता. पंढरपुर, जि. सोलापुर) यांच्या विरोधात चिंचवड पोलीस ठाण्यात ४८८/२०२४ भा.न्या.सं. कलम ३१९ (२), ३१८ (४), ३३६ (२), ३३६(३), ३४०(२), ३(५) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी अटकेत आहे.
विठठल करंबळकर, सहाय्यक पोलीसनिरीक्षक, चिंचवड पो. पुढील तपास करीत आहेत.












