न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ३० नोव्हेंबर २०२४):- पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांच्या मार्गदर्शनाखाली सेवानिवृत्त पोलीस अधिकारी व अंमलदार यांचा सत्कार व निरोप समारंभाचे आयोजन आज (दि. ३० ) रोजी १२.३० वाजता पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय येथील शिवनेरी सभागृह येथे या ठिकाणी करण्यात आले होते .
पिंपरी चिंचवड आयुक्तालयातील आस्थापनेवरील नियत वयोमानाने सेवानिवृत्त झालेले महंमदशाह अल्लाबक्ष भेंडिगिरी (पो. उप. निरीक्षक), विजय शिवराम वाघोले (श्रेणी पो. उपनिरीक्षक), विश्वास श्यामसिंग पाटील (पोहवा/१९९१) यांचा सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमात मा. विवेक पाटील, सो, पोलीस उपआयुक्त (मुख्यालय), पिंपरी-चिंचवड यांनी त्यांच्या हस्ते नियत वयोमानाने सेवानिवृत्त झालेले पोलीस अधिकारी व अंमलदार यांचा कुटुंबियासह शाल, श्रीफळ, पुष्पहार, सेवानिवृत्त प्रमाणपत्र, ओळखपत्र, झाडाचे रोपटे, भेटवस्तू देवून सत्कार केला. तसेच त्यांच्या भावी आयुष्याकरिता व आरोग्याकरिता शुभेच्छा दिल्या.
या कार्यक्रमास पोलीस उपआयुक्त (मुख्यालय), विवेक पाटील, पो.उपनिरीक्षक नितीन लांडगे, पो. उपआयुक्तालयातील कर्मचारी व सेवानिवृत्त झालेले अधिकारी व अंमलदार आदी उपस्थित होते.












