- अनधिकृत बांधकामप्रकरणी दोघांच्या विरोधात खटले दाखल…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ३० नोव्हेंबर २०२४) :- मावळ तालुक्यातील गहुंजे परिसरातील अनधिकृत बांधकामावर पीएमआरडीएने मोठ्या स्वरूपात कारवाई करण्याची मोहीम सुरू केली आहे. काही दिवसांपूर्वी गहुंजे गावातील अनधिकृत बांधकामावर पीएमआरडीने कारवाई करीत बांधकाम उध्वस्त केले होते.
आता गहुंजे गावातील दोन अनधिकृत बांधकामधारकांवर कारवाई करून त्यांच्या विरोधात पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीएमआरडीएच्या निर्देशांकडे या दोन्ही अनधिकृत बांधकाम धारकांनी दुर्लक्ष करीत अनाधिकृत बांधकामांची उभारणी केली आहे.
पहिल्या घटनेत इंदाराम चौधरी या अनधिकृत बांधकामधारकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याने गहुंजेतील गट नं.१९८ येथे विनापरवाना ९६०० स्केअर फुट अनाधिकृत बांधकाम केले आहे.
दिपक कुमार सहानी या दुसऱ्या अनधिकृत बांधकामधारकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याने गहुंजे येथे गट नं.१९८ येथे विनापरवाना ५६०० स्केअर फुट अनाधिकृत बांधकाम उभारले आहे.
या दोघांच्या विरोधात पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण, नवीन प्रशासकीय इमारत, आकुर्डी येथील कनिष्ठ अभियंता यांनी फिर्याद दिली आहे.
त्यांच्या विरोधात तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात ४८९/२०२४ महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व रस्ता नगर रचना अधिनियम १९६६ च्या कलम ५४ चे पोट कलम २ प्रमाणे गुन्हा नोंदविण्यात आला आहे.












