न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ३० नोव्हेंबर २०२४) :- राज्यात नुकत्याच पार पडलेल्या विधानसभेच्या निवडणुका आणि त्याचा राज्यात लागलेला धक्कादायक निकाल हा संशोधनपर असल्याचा दावा सर्वसामान्य नागरिक, मतदार व्यक्त करीत आहेत. निवडणुकीच्या एक महिना अगोदर ईव्हीएम मशीन गुजरात सुरत येथून मागवण्यात आल्या. प्रत्येक वेळेला गुजरात हे राज्य निवडणुकीच्या लागणाऱ्या सामुग्री साठीच का? निवडले जाते.
ईव्हीएम मशीन घोटाळा करून निवडणूक जिंकल्या जातात, असं मत भारतातील सर्वसामान्य नागरिकांना वाटत आहे. शिव शाहू फुले आंबेडकर व अण्णाभाऊ चळवळ हे महाराष्ट्रामध्ये या ईव्हीएम मशीनच्या विरोधामध्ये आंदोलन छेडणार आहे.
त्या दृष्टिकोनाने पहिले पाऊल हे पिंपरी चिंचवड शहरातून पडणार आहे. शिव शाहू, फुले, आंबेडकर व अण्णाभाऊ चळवळीतील सर्व सामाजिक संघटना रविवार (दि. ०१ डिसेंबर २०२४) रोजी सकाळी साडेअकरा वाजता पिंपरीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकामध्ये आंदोलन करणार आहे. संभाजी ब्रिगेड उद्या होणाऱ्या ईव्हीएम मशीनच्या विरोधात भ्रष्टाचार निर्मूलन समिती महाराष्ट्राच्या वतीने जाहीर पाठिंबा देणार आहे.
या आंदोलनामध्ये भ्रष्टाचार निर्मूलन समिती महाराष्ट्र राज्य तसेच पिंपरी चिंचवड शहर कमिटी, भिमशाही युवा संघटना अध्यक्ष शिवशंकर उबाळे, या आंदोलनामध्ये सामिल होणार आहेत.
भ्रष्टाचार निर्मूलन समिती महाराष्ट्र राज्य राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. चंद्रकांत उदगुडे पाटील, तसेच भ्रष्टाचार निर्मूलन समिती उपाध्यक्ष महाराष्ट्र राज्य शांताराम गणेश खुडे यांसह भ्रष्टाचार निर्मूलन समिती महाराष्ट्र राज्यचे उपाध्यक्ष शांताराम गणेश खुडे यांनी सर्व सामाजिक संघटनांना उपस्थित राहण्याबाबत आवाहन केले आहे.












