न्यूज पीसीएमसी नेटवर्क
भोसरी (दि. १३ मे २०१९) :- मागे झालेल्या भांडणाची मनात तिडीक ठेवून तिघांनी तरुणावर जीवघेणा हल्ला केला आहे. मोशीतील भाजी मार्केट जवळ रविवारी घटना घडली असून, याप्रकरणी विशाल विश्वनाथ शिनगारे वय २८, रा. मोशी यांनी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
आरोपींचे मागील काही दिवसांपूर्वी भांडण झाले. त्या भांडणाचा राग मनात धरून रविवारी (दि. १२) रोजी दुपारी आरोपींनी रिक्षा हळू चालविण्याच्या कारणावरून तरुणाशी भांडण केले. त्याच्या डोळ्यात मिरची पूड टाकून त्याच्यावर कोयत्याने वार केले. यामध्ये तरून गंभीर जखमी झाला.
भोसरी पोलिसांनी या प्रकरणात दोघांना अटक केली असून अक्षय उर्फ टकल्या सुदाम गायकवाड वय २०, शुभम बाळू खरात वय २१, दोघे रा. गांधीनगर मोशी अशी अटक केलेल्या दोघांची नावे आहेत. तर इस्तियाक खान हा आरोपी अद्याप फरार आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक शिंदे तपास करीत आहेत.











