न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १३ मे २०१९) :- शास्त्री चौकाजवळ कासारवाडी येथे सुखवानी पॅराडाईजमध्ये दुकानाचे शटर उचकटून अज्ञात चोरट्यांनी ६५ हजार रुपये किमतीच्या सिगारेट चोरून नेल्या. शनिवारी रात्री साडेदहाच्या सुमारास दुकान कुलूप लावून बंद केले होते. रात्री अज्ञात चोरट्यांनी दुकानाचे शटर उचकटून दुकानात प्रवेश केला.
काउंटरच्या खाली ठेवलेले ६५ हजार रुपये किमतीचे सिगारेट चोरट्यांनी चोरून नेले. रविवारी सकाळी पावणे अकराच्या सुमारास हा प्रकार उघडकीस आला. याबाबत सुनील लक्ष्मणदास मगनानी (वय ३२, रा. पिंपरी) यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक गाढवे पुढील तपास करीत आहेत.















