न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १४ डिसेंबर २०२४) :- पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय हद्दीतील वाकड येथील कावेरीनगर पोलीस वसाहतीमध्ये पोलीस दवाखाना कार्यन्वीत केला आहे. या सुसज्ज अशा पोलीस दवाखान्याचे उद्घाटन पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांच्या हस्ते शुक्रवारी (दि. १३) रोजी करण्यात आले आहे.
या हॉस्पीटलकरीता डॉ. राधाकृष्ण पवार, डॉ. एमपल्ले यांचे पोलीस हॉस्पीटल उभारणी करीता वेळोवेळी मार्गदर्शन व सहकार्य लाभले. वैदयकिय अधिकारी डॉ. अनुपमा कांबळे, डॉ. संजय भारती यांचेसह ८ जनांचा स्टाफ नियुक्त करण्यात आला आहे.
यावेळी पोलीस हॉस्पीटल उद्घाटनासाठी पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, पोलीस सह आयुक्त डॉ. शशिकांत महावरकर, अपर पोलीस आयुक्त वसंत परदेशी, पोलीस उप आयुक्त (गुन्हे) संदिप डोईफोड, पोलीस उप आयुक्त (मुख्यालय) विवेक पाटील, पोलीस उप आयुक्त (परि-१) स्वप्ना गोरे, पोलीस उप आयुक्त (परि-२) विशाल गायकवाड, पोलीस उप आयुक्त (परि- ३) डॉ. शिवाजी पवार, पोलीस उप आयुक्त (वाहतुक) बापु बांगर, डॉ राधाकृष्ण पवार उपसंचालक आरोग्य विभाग, पुणे, डॉ एमपल्ले प्रमुख औंध हॉस्पीटल, डॉ राउत आदी उपस्थित होते.
पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे म्हणाले, ‘कायदा व सुव्यवस्था संभाळण्याकरीता पोलीस दल कायम तत्पर असते मात्र, कामाचा ताण, शारीरीक, मानसिक थकवा यामध्ये पोलिसांना स्वतःकडे लक्ष देण्यासाठी वेळ मिळत नाही. अनेकदा पोलीस अधिकारी व अंमलदार यांना २४ तास ऑनडयुटी रहावे लागते. त्यामुळे पोलीस अधिकारी अंमलदार यांच्या आरोग्याचे प्रश्न निर्माण होतात. तसेच विविध आजार उध्दभवतात.
पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय अंतर्गत एकुण ४,९२७ महिला व पुरुष अधिकारी व अंमलदार कार्यरत असुन पोलीस अधिकारी व अंमलदार तसेच त्याच्या कुटुंबीयांच्या आरोग्यासाठी पोलीस दवाखाना चालु करण्यात आला आहे. पोलीस अधिकारी अंमलदार तसेच मंत्रालयीन कर्मचारी व त्यांच्या कुटुंबीयांना पोलीस हॉस्पीटलचा लाभ मिळणार आहे.