न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १४ डिसेंबर २०२४) :– कामावर नसलेल्या मानधन तत्वावरील कर्मचाऱ्यांची बिले काढून, २० लाख ७४ हजार, ६०० रुपयांचा आर्थिक अपहार करण्यासाठी सुकर परिस्थिती निर्माण केल्याचे दिसून आल्याने महापालिकेच्या दोन महिला वैद्यकीय अधिकाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे.
अपहार करणारा लिपिक दत्तात्रय पारधी याला यापूर्वीच निलंबित करण्यात आले आहे. ज्येष्ठ वैद्यकीय अधिकारी डॉ. संगिता तिरुमणी आणि डॉ. सुनिता साळवे यांच्यावर दंडात्मक कारवाई केली असून, त्यांच्या मसिक वेतनातून ही रक्कम वसूल करण्याचे आदेश महापालिका आयुक्त शेखर सिंह यांनी दिले आहेत.
वैद्यकीय अधिकारी तालेरा आणि जिजामाता रुग्णालयात कार्यरत आहेत. सप्टेंबर २०२० ते मार्च २०२३ या कालावधीत वैद्यकीय विभागामार्फत मानधन तत्वावरील कर्मचाऱ्यांची २० लाख ७४ हजार, ६०० रकमेची बिले काढण्यात आली. मात्र, हे कर्मचारी कार्यरत नसल्याची बाब लेखा परीक्षणात समोर आली. लिपिक दत्तात्रय पारधी याला यापूर्वीच निलंबित करण्यात आले आहे. अधीनस्थ कर्मचाऱ्यांवर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी या दोन्ही महिला वैद्यकीय अधिकाऱ्यांवर होती. परंतु त्यांनी कामात हलगर्जीपणा केल्याचे दिसून आले. तसेच त्यांचे खुलासे संयुक्तिक नव्हते. यामुळे त्यांच्यावरही कारवाई करएण्यात आली आहे.
















