न्यूज पीसीएसी नेटवर्क
पिंपरी (दि. १४ मे २०१९) :- पिंपरी चिंचवड शहरात स्वाइन सदृश एक रुग्ण आढळला आहे. संबंधित रुग्णाच्या घशातील द्रव प्रयोगशाळेत पाठविण्यात आला आहे. अद्यापपर्यंत ५५ जणांच्या घशातील द्रव प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत.
सोमवारी (दि. १३) रोजी ३६ जणांना टॅमी फ्लूच्या गोळ्यांचे वाटप करण्यात आले. या वर्षी ३ हजार ७८० जणांना टॅमी फ्लूच्या गोळ्यांचे वाटप करण्यात आले आहे. सोमवारी १ हजार ११४ जण सर्दी, तापाचे रुग्ण आढळले आहेत. नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन वैद्यकीय विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.











