न्यूज पीसीएसी नेटवर्क
पिंपरी (दि. १४ मे २०१९) :- टिकटॉकमध्ये ‘वाढीव दिसताय वा राव’ या लावणीवर हातामध्ये कोयत्यासारखे हत्यार घेऊन चित्रीकरण करणे एका गुन्हेगाराच्या चांगलेच अंगलट आले आहे. वाकड पोलिसांनी ‘ त्या ‘ वाढीव असणाच्या गुन्हेगारावर गुन्हा दाखल करून त्यास अटक केली आहे.
दीपक आबा दाखले (वय २३, रा. रहाटणी) असे अटक केलेल्या वाढीव गुन्हेगाराचे नाव आहे. आरोपी दीपक याने परिसरात दहशत पसरविण्यासाठी टिकटॉकचा वापर या करून एक व्हिडिओ तयार केला, या व्हिडिओमध्ये ‘वाढीव दिसताय राव’ या लावणीवर हातामध्ये कोयत्यासारखे (पालघन) हत्यार घेऊन एका घरातून बाहेर येताना चित्रीकरण करण्यात आले आहे.
वाकड पोलिसांच्या तपास पथकातील हरीश माने यांच्या हाती हा व्हिडिओ लागला. त्यांनी तत्काळ दाखले याला उचलून आणण्याचे आदेश दिले. त्यानुसार पथकातील कर्मचा-यांनी राहत्या घराजवळ सापळा रचून त्यास ताब्यात घेतले. त्याच्याकडून व्हिडिओमध्ये वापरण्यात आलेले हत्यारदेखील जप्त करण्यात आले आहे.


















