न्यूज पीसीएसी नेटवर्क
पिंपरी (दि. १४ मे २०१९) :- मामुर्डी ते गहुंजे रस्त्यावरील क्रिकेट स्टेडियमशेजारी ‘एक्सप्रेस वेपासून’ १०० मीटर अंतरावर असलेल्या एका झाडावर करणी करण्यासाठी झाडाचा वापर केला. झाडावर लिंबू-मिरची ठोकून चिठ्या अडकविल्या जातात. त्यामुळे संपूर्ण झाड अक्षरशः विद्रुप झाले होते.
अंघोळीची गोळी -खिळेमुक्त झाडे या अभियानाच्या सदस्यांना जागरूक नागरिकाने ही माहिती दिली. झाडाच्या एका दिशेला जागतिकस्तरावरील क्रिकेट स्टेडियम, दुस-या बाजूला एक्सप्रेस वे, उच्चभ्रू सोसायटी आणि दुस-या बाजूला अंधश्रद्धा असे धक्कादायक चित्र स्वयंसेवकांना पाहावयास मिळाले. सदस्यांनी तात्काळ हे झाड रविवारी (दि. १२) रोजी खिळेमुक्त व लिंबू-मिरचीमुक्त केले. तब्बल २५ लिंबू-मिरची काढण्यात आल्या.
या अभियानात अंघोळीची गोळीच्या प्राजक्ता रुद्रवार, केतकी नायडू, गणेश बोरा, ज्ञानेश्वर भंडारे, सचिन खोले, विश्वेश आणि सिद्धेश खोले आदींनी सहभाग घेतला. या कृतीतून स्वयंसेवकांनी झाडाचे सवर्धन करा. त्यावर श्रद्धा ठेवा. अंधश्रद्धेमुळे झाडांचा बळी घेऊ नका, असा संदेश त्यांनी दिला.











