न्यूज पीसीएसी नेटवर्क
पिंपरी (दि. १४ मे २०१९) :- रहाटणी, पिंपळे सौदागर भागात शनिवारी (दि. ११) रोजी ‘ड’ क्षेत्रीय कार्यालयातर्फे अतिक्रमण विरोधी कारवाई करण्यात आली. या कारवाईमध्ये हातगाडी, टपरी तसेच वाहतुकीस अडथळा ठरणारे साहित्य जप्त करण्यात आले.
सात हातगाड्या, प्रत्येकी १ लोखंडी टपरी, लोखंडी बाकडे, मोठी छत्री, लोखंडी टेबल, ऊसाच्या रसाचे मशीन, प्लॅस्टिक टेबल तसेच २ लोखंडी फ्रेम, प्रत्येकी ४ प्लॅस्टिक खुच्र्या, स्टॅण्ड बोर्ड, प्रत्येकी ३ लोखंडी प्लेट, लोखंडी काऊंटर, ५ प्लॅस्टिक स्टूल आदी साहित्याचा त्यामध्ये समावेश आहे. संबंधित जप्त केलेले साहित्य नेहरूनगर येथील अण्णासाहेब मगर स्टेडियम येथे जमा करण्यात आले आहे.











