- दोन्ही स्थानकांची नावे बदलण्याची होतेय मागणी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १९ डिसेंबर २०२४) :- पिंपरी-चिंचवड शहरात मेट्रोचे सहा स्टेशन आहेत. त्यापैकी भोसरी आणि पीसीएमसी या दोन स्टेशनची नावे चुकीचे असल्याने ती नावे बदलण्याची मागणी होत आहे. त्याबाबत महामेट्रो प्रशासनाकडून कोणताही प्रतिसाद मिळत नसल्याने शहरवासीयांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे.
कासारवाडी येथील नाशिक फाटा स्टेशनचे नाव महामेट्रोने भोसरी असे ठेवले आहे. त्या स्टेशनपासून भोसरी हे ठिकाणी सुमारे ७ ते ८ किलोमीटर अंतरावर आहे. या चौकातच कासारवाडी रेल्वे स्टेशन तसेच, पीएमपीएलचा नाशिक फाटा नावाने बीआरटीएस थांबा आहे. असे असताना महामेट्रोने या स्टेशनला चुकीचे नाव दिल्याने प्रवाशांमध्ये संभ्रम निर्माण होत आहे. हे नाव बदलण्याची मागणी मेट्रो सुरू होण्यापूर्वीपासून होत आहे.
मोरवाडी, पिंपरी येथील पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर चौकात मेट्रोचे पीसीएमसी स्टेशन आहे. पीसीएमसी याचा अर्थ पिंपरी-चिंचवड महानगरपालिका असा आहे. मात्र, ते नाव पिंपरी-चिंचवड महानगरपालिका भवन असा असायला हवा होता. पीसीएमसी नाव बदलून थेट पिंपरी मेट्रो स्टेशन असे असावे, अशी मागणी आहे.
”भोसरी मेट्रो स्टेशनचे नाव बदलण्याबाबत महामेट्रोकडे पत्र आले आहे. मात्र, पीसीएमसी नावाबाबत कोणतेही पत्र नाहीत. महामेट्रोच्या एका समितीकडून तो प्रस्ताव राज्य शासनाकडे पाठविण्यात आला आहे. मंजुरीनंतर त्याबाबत गॅझेट प्रसिद्ध केले जाईल. त्यानंतर त्या स्टेशनचे नाव रितसरपणे बदलण्यात येईल.
– डॉ. हेमंत सोनवणे – महामेट्रो संचालक”…

















1 Comments
Emilio Mccowin
You are my intake, I own few web logs and rarely run out from post :). “He who controls the past commands the future. He who commands the future conquers the past.” by George Orwell.