न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १९ डिसेंबर २०२४) :- महापालिकेच्या वतीने ‘क’ क्षेत्रीय कार्यालयांतर्गत अनधिकृत बांधकाम व पत्राशेडवर कारवाई करण्यात आली. या कारवाईमध्ये कुदळवाडी पोलिस चौकी येथे १८ मीटर रुंद डी.पी. रस्ता (३०० मीटर लांबी) व कुदळवाडी पोलिस चौकी ते विसावा चौक या ३० मीटर रुंद डी.पी. रस्ता ५५० मीटर लांबीच्या डी.पी. रस्ता रस्त्याच्या दुतर्फा सुमारे ९००० चौ.मी. क्षेत्रातील ३० आरसीसी बांधकामे, तसेच सुमारे ४००० चौमी क्षेत्रामधील ४५ वीट बांधकामांसह पत्राशेड पाडण्यात आले.
महापालिका आयुक्त शेखर सिंह, अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे – पाटील, शहर अभियंता मकरंद निकम व उपायुक्त मनोज लोणकर यांच्या मार्गदर्शनाखाली ‘क’, ‘ड’ व ‘फ’ क्षेत्रीय कार्यालयाचे सहायक आयुक्त तानाजी नरळे, राजेश आगळे, सीताराम बहुरे तसेच कार्यकारी अभियंता सूर्यकांत मोहिते (बांधकाम परवानगी), कार्यकारी अभियंता क स्थापत्य सुनीलदत्त नरोटे, उपअभियंता मनोज बोरसे, नरेश जाधव यांच्या नेतृत्वाखाली कनिष्ठ अभियंता संदीप वैद्य, किरण सगर, अशोक मोरे, अश्रुबा वाकोडे, इम्रान कलाल, अनिल गडदे, व क्षीतिजा देशमुख, तसेच स्थापत्य अभियांत्रिकी सहायक सुमीत जाधव, ऐश्वर्या मासाळ व इतर ‘इ’ व ‘फ’, कडील ०६ स्थापत्य अभियांत्रिकी सहायक व मनपा कर्मचारी, महाराष्ट्र सुरक्षा बल जवान, महाराष्ट्र पोलिस कर्मचारी यांच्या नियंत्रणाखाली कारवाई करण्यात आली.
महापालिका आयुक्त यांच्या निर्देशनानुसार सदर कारवाईच्या ठिकाणी परवानगीविना अनधिकृत बांधकाम करु नये, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.














