न्यूज पीसीएसी नेटवर्क
पिंपरी (दि. १४ मे २०१९) :- पिंपरी चिंचवड शिवजयंती उत्सव समितीतर्फे छत्रपती संभाजी महाराज जयंतीनिमित्त शाहूनगर येथील बर्ड व्हॅली येथील संभाजी महाराजांच्या स्मारकासमोर विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
याप्रसंगी दीपप्रज्वलन आणि हातामध्ये मशाली घेऊन अभिवादन करण्यात आले. संभाजी बिग्रेडचे उपाध्यक्ष सतीश काळे, माजी नगरसेवक मारुती भापकर, जीवन बो-हाडे, सागर तापकीर, अभिषेक म्हसे, विनायक जगताप, जालिंदर खतकर आदी यावेळी उपस्थित होते. मंगळवारी (दि. १४) रोजी सकाळी पुरंदर येथे अभिवादन करण्यासाठी समितीचे पदाधिकारी जाणार असल्याचे समितीच्या वतीने सांगण्यात आले.


















