- महापालिकेच्या पर्यावरण विभागाचा दावा..
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २० डिसेंबर २०२४) :- पिंपरी : दोन दिवसांपूर्वी थेरगाव केजुदेवी येथील बंधाऱ्यापासून चिंचवडपर्यंत नदी फेसाळली होती. नदी फेसाळल्याच्या दुसऱ्याच दिवशी गुरुवारी शेकडो मासे मृत आढळून आले.
पवना नदीत येणारा फेस हा साबणाच्या पाण्याचा, डिटर्जंटचा असावा? असा अंदाज महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने लावला आहे. ‘साबणाच्या पाण्याने मासे मरतात का?’ असा प्रश्न पर्यावरणवादी संस्थांनी विचारला आहे.
नदीच्या पाण्याची पातळी वाढल्यानंतर केजुदेवी बंधाऱ्यावरून पाणी पडल्यामुळे पाण्याला फेस येतो, हा फेस रसायनयुक्त पाण्याचा नसून साबण किंवा डिटर्जंटचा आहे, असे प्रदूषण नियंत्रण मंडळाने आजवर केलेल्या तपासण्यांमध्ये आढळून आले आहे.
नदीत मृत मासे आढळल्याचे कळताच पर्यावरण विभाग पथकाने पाहणी केली. हद्दीबाहेरून दूषित पाणी आल्याने मासे मृत झाले असावेत. आपल्या हद्दीत कोठेही रसायनयुक्त पाणी नदीत सोडले जात नाही.
– संजय कुलकर्णी, सहशहर अभियंता, पर्यावरण विभाग…











