न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २३ डिसेंबर २०२४) :- मुलीसोबत भांडण केल्याने सासू जावयाच्या घरी जाब विचारण्यासाठी आली असता जावयाने सासू, दोन मेहुणे आणि मेहुणी यांना मारहाण करून जखमी केले. तसेच सासू, दोन मेहुणे आणि मेहुणी यांनीही जावयाला मारहाण केली.
याप्रकरणी काळेवाडी पोलिस ठाण्यात परस्परविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. ही घटना १६ डिसेंबर रोजी थेरगाव येथे घडली.
स्वाती मारुती साळुंके यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार पती मारुती महादेव साळुंके (३७, रा. काळेवाडी) आणि सासूविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला. स्वाती यांची आई, बहीण आणि दोन भाऊ हे स्वाती यांना मारुती याने मारहाण केल्याचा जाब विचारण्यासाठी आले होते. त्यावेळी मारुती याने त्यांना मारहाण करून शिवीगाळ केली. तसेच कोयत्याने ठार मारण्याची धमकी दिली.
याच्या परस्परविरोधात मारुती महादेव साळुंके यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार रोहन बबन कांबळे (वय २६), प्रसाद बबन कांबळे (२८) आणि दोन महिलांच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
मारुती आणि त्यांच्या पत्नीचे भांडण झाले होते. मारुती यांचा मेहुणा रोहन आणि प्रसाद, सासू आणि मेहुणी यांनी मारुती यांच्या घरात येऊन त्यांना शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. सासूने मारुती यांना पकडून ठेवत मेहुण्याने लाकडी दांडके डोक्यात मारून त्यांना गंभीर जखमी केले.















2 Comments
Renita Schrom
Hi! I just wanted to ask if you ever have any problems with hackers? My last blog (wordpress) was hacked and I ended up losing several weeks of hard work due to no data backup. Do you have any solutions to stop hackers?
Basketball Matches Online
me encantei com este site. Pra saber mais detalhes acesse nosso site e descubra mais. Todas as informações contidas são conteúdos relevantes e exclusivos. Tudo que você precisa saber está está lá.