न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०१ जानेवारी २०२५) :- पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयातील भोसरी पोलिस ठाण्याने उत्कृष्ट कामगिरी करत राज्यातील पाच सर्वोत्तम पोलिस ठाण्यांमध्ये चौथ्या क्रमांकावर स्थान मिळवले आहे. कायदा-सुव्यवस्था राखणे आणि गुन्हेगारी रोखण्याच्या कामगिरीसाठी या ठाण्याला हा सन्मान मिळाला आहे.
केंद्रीय स्तरावर दहा उत्कृष्ट पोलिस ठाण्यांची निवड करण्यासाठी राज्यातून पाच ठाण्यांची निवड करण्यात आली. यामध्ये शिवाजीनगर (कोल्हापूर), देगलूर (नांदेड), विरगाव (छत्रपती संभाजीनगर), शिरोळ (कोल्हापूर) आणि भोसरी (पिंपरी-चिंचवड) या ठाण्यांचा समावेश आहे.
भोसरी पोलिस ठाण्याला हा मान मिळवून देण्यात तत्कालीन पोलिस आयुक्त कृष्ण प्रकाश, अंकुश शिंदे, सहआयुक्त, संजय शिंदे, अपर आयुक्त रामनाथ पोकळे तत्कालीन वरिष्ठ निरीक्षक भास्कर जाधव आणि अन्य अधिकाऱ्यांचे मोठे योगदान आहे.
पोलिस ठाण्यांच्या कामाचे मूल्यमापन करून त्यांना प्रोत्साहन दिले जाते. भोसरी ठाण्याने संवेदनशील ठाण्यापासून उत्कृष्ट ठाण्यापर्यंतचा प्रवास केला आहे. हा सन्मान आमच्या सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या मेहनतीचा आहे. यामुळे आम्हाला आणखी चांगले काम करण्याची प्रेरणा मिळाली.
– भास्कर जाधव, तत्कालीन वरिष्ठ निरीक्षक
भोसरी ठाण्याचा सन्मान झाल्याने पिंपरी-चिंचवड आयुक्तालयाची प्रतिष्ठा वाढली आहे. हा पुरस्कार पोलिसांना प्रोत्साहन देणारा आहे. भोसरी पोलिस ठाण्याने राज्यात आपले स्थान पक्के केले असून, आता देशातील दहा सर्वोत्तम ठाण्यांमध्ये निवड होण्याची आशा आहे.
– विनय कुमार चौबे, पोलिस आयुक्त, पिंपरी-चिंचवड…














1 Comments
tlover tonet
This design is incredible! You certainly know how to keep a reader amused. Between your wit and your videos, I was almost moved to start my own blog (well, almost…HaHa!) Great job. I really loved what you had to say, and more than that, how you presented it. Too cool!