न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०१ जानेवारी २०२५) :- भाजीपाला विक्रीचा स्टॉल लावण्यासाठी खंडणीची मागणी करत तिघांनी वाहनांची तोडफोड करून दहशत निर्माण केली. ही घटना सोमवारी (दि. ३०) रात्री आठ वाजता मोशीतील आदर्शनगर येथे आठवडे बाजारात घडली. पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाने तिघा संशियतांना कात्रज येथील एका लॉजमधून जेरबंद केले.
अनिकेत भरत उतळे (१९, रा. आदर्शनगर, मोशी) याला पोलिसांनी अटक केली असून दोन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले आहे. शेषेराव सोनेराव फड (५०, रा. मोशी) यांनी एमआयडीसी भोसरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. फिर्यादी फड हे भाजी विक्रीचा व्यवसाय करतात. त्यांना भाजी विक्रीचा स्टॉल लावण्यासाठी संशयितांनी खंडणीची मागणी केली. फड यांनी संशयितांना खंडणी दिली नाही, त्या कारणावरून संशयितांनी फड यांच्या वाहनाची आणि इतर वाहनांची दगड व कोयत्याने तोडफोड करून नुकसान केले. या गुन्ह्याचा खंडणी विरोधी व औद्योगिक तक्रारी निवारण पथकामार्फत समांतर तपास सुरू होता. संशयित कात्रज येथील अश्विनी लॉजमध्ये असल्याची माहिती मिळाली. छापा टाकून तिघा संशयितांना जेरबंद केले.
पोलिस आयुक्त विनय कुमार चौबे, सह आयुक्त डॉ. शशिकांत महावरकर, अपर आयुक्त वसंत परदेशी, उपायुक्त संदीप डोईफोडे, शिवाजी पवार, सहायक आयुक्त बाळासाहेब कोपनर यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक देवेंद्र चव्हाण, वरिष्ठ पोलिस निरीक्षक गणेश जामदार, पोलिस उपनिरीक्षक सुनील भदाणे, पोलिस अंमलदार आशिष बोटके, प्रदीप गोडांबे, मंगेश जाधव, नितीन खेसे, चंद्रकांत गवारी यांच्या पथकाने ही कारवाई केली.
—














2 Comments
tlovertonet
Some genuinely interesting points you have written.Aided me a lot, just what I was searching for : D.
Harry Walper
Hi my loved one! I wish to say that this post is amazing, great written and come with approximately all important infos. I would like to look extra posts like this .