- महाळुंगेतील घटना; पोलीस आयुक्तालयात हळहळ…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
महाळुंगे (दि. ०१ जानेवारी २०२५) :- वर्षाखेरीस बंदोबस्त करून पहाटे घरी जात असताना एका पोलीस उपनिरीक्षकाचा अपघाती मृत्यू झाल्याची घटना बुधवारी पहाटे महाळुंगे येथे घडली.
जितेंद्र गिरनार असे मृत्यू झालेल्या पोलीस उपनिरीक्षकाचे नाव आहे. गिरनार हे महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात नेमणुकीस होते. वर्षाखेरीस ते दिवस-रात्र बंदोबस्तासाठी तैनात होते. बुधवारी पहाटे बंदोबस्त संपवून ते घरी जात होते. महिंद्रा कंपनी समोरून ते गाडीने जात होते. समोर एक कंटेनर उजव्या लेन मधून चालला होता मात्र, कंटेनर चालकाने अचानकपणे कंटेनर डाव्या लेनमध्ये घुसला.
गिरनार यांच्या गाडीला कंटेनरची पाठीमागून जोरदार धडक बसली. या अपघातात गिरनार गंभीर जखमी झाले. त्यातच त्यांचा मृत्यू झाला. या घटनेने पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयात हळहळ व्यक्त केली जाती आहे.
गिरनार मागील काही वर्षांपासून पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयात कार्यरत आहेत. पूर्वी ते वाकड पोलीस ठाण्यात नेमणुकीस होते. त्यानंतर मागील काही महिन्यांपूर्वी त्यांची महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात बदली झाली होती.














1 Comments
tlovertonet
I am impressed with this website , rattling I am a big fan .