न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०१ जानेवारी २०२५) :- दुकानात येऊन दुकानदाराकडे दोन हजार रूपयांच्या खंडणीची मागणी केली. ती न दिल्याने ‘मी इथला भाई आहे, तुला माहित नाही काय ? तुला जगायचा कंटाळा आला काय? अशी शिवीगाळ व दमदाटी करीत लाकडी दांडके दुकानाच्या काऊंटरवर मारले. दुचाकीचेही नुकसान केले.
परिसरात राहणारे लोक आरोपी तरुणाला आडवण्यासाठी मध्ये आले असता आरोपीने हातातील लाकडी दांडके त्यांच्या दिशेन फिरवत त्यांच्या अंगावर धावून गेला. त्यामुळे घाबरून लोक घरात पळून गेले. या भागात दहशत निर्माण करण्याकरीता परिसरातील रस्त्याच्या कडेला पार्क केलेल्या दुचाकीचेही नुकसान करीत आरोपी निघून गेला आहे.
हा प्रकार (दि ३१/१२/२०२४) रोजी बालाजीनगर, एमआयडीसी भोसरी परिसरात घडला. ४७ वर्षीय महिलेने आरोपी अशोक पवार (वय १९ वर्षे) याच्या विरोधात फिर्याद दिली आहे. एमआयडीसी भोसरी पोलिसांनी तरुणाला अटक केली आहे. पुढील तपास पोउपनि इंगळे हे करीत आहेत.














2 Comments
tlovertonet
Whats up very nice blog!! Man .. Excellent .. Wonderful .. I’ll bookmark your website and take the feeds alsoKI am satisfied to search out numerous helpful information right here in the post, we want work out more strategies on this regard, thanks for sharing. . . . . .
Free MMA Streaming
Excellent read, I just passed this onto a friend who was doing a little research on that. And he just bought me lunch because I found it for him smile Thus let me rephrase that: Thank you for lunch!