न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०३ जानेवारी २०२५) :- पिंपळे सौदागर येथील लिनिअर गार्डन येथे ‘ फार्मर स्ट्रीट’ चे आयोजन करण्यात आले आहे. या ठिकाणी पुढील दोन दिवस (४ व ५ जानेवारी) सकाळी ७ ते रात्री ९ पर्यंत रंगणाऱ्या या कार्यक्रमात नैसर्गिक व ताज्या फळे व भाजीपाला विक्री, नैसर्गिक सौंदर्य प्रसाधने या सोबतच मनोरंजनाचा देखील कार्यक्रम होणार आहेत.
या फार्मर स्ट्रीट मध्ये शेतकरी, नर्सरी यांच्या सोबतच फूड प्रोसेसिंग कंपन्या आपला माल विक्रीसाठी घेऊन येणार आहेत. यात ऑरगॅनिक शेती माल, प्रोसेसेड फूड, नॅचरल सौंदर्यप्रसाधने याशिवाय इतर मालाचा देखील समावेश असणार आहे.
यावेळी होणाऱ्या मोफत मनोरंजन कार्यक्रमामध्ये झुंबा, योगा, ड्रम सर्कल व लाईव्ह सिंगर चा कर्यक्रम होणार आहे. मावळा तर्फे लहान मुलांसाठी ‘रणांगण’ नावाचा खेळ घेतला जाणार आहे. या फार्मर स्ट्रीट कार्यक्रमाचा लाभ जास्तीत जास्त नागरिकांना घ्यावा असे आवाहन महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह व उद्यान व वृक्ष संवर्धन विभागाचे उपआयुक्त उमेश ढाकणे यांनी केले आहे.
पिंपरी चिंचवड शहरातील नागरिकांसाठी राबविण्यात येत असलेल्या फार्मर स्ट्रीट प्रदर्शन उपक्रमात शहरातील नागरिकांना सहभागी घ्यावा व नैसर्गिक उत्पादन प्रदर्शनासोबतच मोफत होणाऱ्या मनोरंजन कार्यक्रमाचा लाभ घ्यावा.
– शेखर सिंह , आयुक्त तथा प्रशासक ,पिंपरी चिंचवड महानगरपालिका…














1 Comments
Kasie Rushman
Great wordpress blog here.. It’s hard to find quality writing like yours these days. I really appreciate people like you! take care