न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०६ जानेवारी २०२५) :- वीज कर्मचारी अधिकारी अभियंता सेनेची नुकतीच पुणे परिमंडळ कार्यकारणी जाहीर झाली. सेनेचे अध्यक्ष राजन भाई भानुशाली यांच्या मंजुरीने व सरचिटणीस मधुकर सुरवाडे यांच्या स्वाक्षरीने परिमंडळ कार्यकारणी जाहीर करण्यात आली.
यामध्ये अध्यक्षपदी मनोहर तुकाराम शिंदे, उपाध्यक्षपदी मनोज सैदाने, सचिवपदी गणेश जाधव, सहसचिवपदी दीपक कुलकर्णी, खजिनदारपदी राहुल गाडे, संघटकपदी सुधीर बालवडकर यांची नियक्ती करण्यात आली आहे.
संघटना व व्यवस्थापन यांच्यामधील दुवा म्हणून नूतन कार्यकारिणीने काम करावे. वीज कर्मचारी, अधिकारी, अभियंता यांच्या समस्या मार्गी लावण्यात पुढाकार घ्यावा, अशी माहिती अभियंता सेनेचे प्रादेशिक सल्लागार संतोष रमाकांत सौंदणकर यांनी दिली. तसेच नूतन कार्यकारिणीचे अभिनंदन देखील केले.












