न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०७ जानेवारी २०२५) :- महापालिकेच्या ड क्षेत्रीय कार्यालय अंतर्गत वाकड येथील प्रभाग क्रमांक २५ व २६ मधील अनधिकृत बांधकामांवर सोमवारी (दि. ६) सकाळी कारवाई करण्यात आली.
महापालिकेच्या अतिक्रमण विभागाकडून ४५ मीटर रस्ता रुंदीकरण प्रक्रियेमध्ये येणाऱ्या अनधिकृत व्यावसायिक पत्र्याचे शेड, आरसीसी बांधकाम यावर कारवाई करण्यात आली.
ही कारवाई महापालिकेचे आयुक्त शेखर सिंह यांच्या आदेशानुसार तसेच अतिरिक्त आयुक्त १ जांभळे पाटील, शहर अभियंता मकरंद निकम, अतिक्रमण अतिरिक्त आयुक्त मनोज लोणकर, ड क्षेत्रीय अधिकारी श्रीकांत कोळप, बांधकाम परवानगी उपभियंता संजय चव्हाण, कनिष्ठ अभियंता अमोल पडलवार, बीआरटीएस विभागाचे कार्यकारी अभियंता संध्या, कनिष्ठ अभियंता सुनिता पिंजण, नगररचना विभागाचे उपभियंता अशोक कुटे व संजय बंडगर यांचे नेतृत्वात करण्यात आली.
अतिक्रमण अनधिकृत बांधकाम विभाग कनिष्ठ अभियंता अमोल शिंदे, अतिक्रमण बीट निरीक्षक सुहास भगत, शेषराव अटकोरे, ऑकार ताटे- देशमुख, मुख, पूजा राठोड यांच्या अधिपत्याखाली अतिक्रमण कारवाई करण्यात आली. या कारवाईमध्ये एकूण ६० व्यावसायिक अनधिकृत पत्राशेड, आर.सी. सी. बांधकाम व वीट बांधकाम, रहिवासी घरे १० अशा अनधिकृत बांधकामांवर अतिक्रमण विभागाकडून कारवाई करण्यात आली. या कारवाईमध्ये सुमारे ४०,००० चौरस फूट क्षेत्र निष्कसित करण्यात आले.
कारवाईदरम्यान पिंपरी चिंचवड महानगरपालिका अतिक्रमण विभागाचे २० अधिकारी व कर्मचारी, ह प्रभाग व ड प्रभागाचे २०० मजूर, महाराष्ट्र राज्य सुरक्षा बलाचे ४० जवान सहभागी होते. २ जेसीबी, १ पोकलेन यांच्या सहाय्याने अतिक्रमण हटविण्यात आले असल्याचे क्षेत्रीय अधिकारी श्रीकांत कोळप यांनी सांगितले.
                                                                    
                        		                    
							












