- कासारवाडीत पाच जणांच्या टोळक्याकडून तरुणाला बेदम मारहाण…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०८ जानेवारी २०२५) :- ‘आमच्या वाहनाला धडक का दिली’ असे म्हणत पाच जणांनी मिळून एका व्यक्तीला बेदम मारहाण केली. ही घटना सोमवारी (दि. ५) रात्री आठ वाजताच्या सुमारास कासारवाडी येथे घडली.
याप्रकरणी पोलिसांनी पाच जणांना अटक केली आहे. योगेश महादेव पोफळकर (वय १८), ओंकार संभाजी लांडगे (वय २३), श्रेयस बाळासाहेब लांडगे (वय २३), गौरव नरेश काशीद (वय २३), सनी राजेंद्र लांडे (वय ३०, सर्व रा. कासारवाडी अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.
प्रवीण जालिंदर बंगे (वय ३५, रा. पिंपळे सौदागर) यांनी दापोडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.












