न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि.१२ जानेवारी २०२५) :- भोसरीतील सेक्टर १० येथील ऋषी पॉलिमर्स प्रा. लि. कंपनी सह तीन ते चार कंपन्यांमध्ये भीषण आग लागली आहे. रविवारी (दि १२) रोजी सायंकाळच्या सुमारास आग लागल्याचे वृत्त हाती आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार या ठिकाणी रबर व प्लास्टिकचे साहित्य बनवण्यात येत होते. ही आग मोठ्या प्रमाणावर पसरली असून, परिसरात धुराचा लोट पसरला आहे.
पिंपरी चिंचवड अग्निशामक दलाच्या भोसरी, मोशी, जाधववाडी आणि पिंपरीतील अग्निशामक केंद्रांमधून १० अतिरिक्त गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न सुरु आहेत. अद्याप आग लागण्याचे कारण समजू शकले नाही.












