न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १३ जानेवारी २०२५) :- तीर्थक्षेत्र देहू-आळंदी या धार्मिक स्थळांसह पिंपरी चिंचवड शहरातील ऐतिहासिक स्थळांचा समावेश असलेली पीएमपीची विशेष पर्यटन बससेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
या बससेवेत चिंचवडगावातील मोरया गोसावी मंदिर, रावेतमधील इस्कॉन मंदिर, प्रतिशिर्डी शिरगाव, देहूमधील संत तुकाराम महाराज मंदिर, गाथा मंदिर व वैकुंठगमन स्थान तर, आळंदीमधील संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी मंदिर व गजान महाराज संस्थान मठ या ठिकाणांचा समावेश आहे.
या बससेवेकरिता वातानुकुलीत बस असून, प्रतिव्यक्तीला ५०० रुपये तिकीट दर आहे. सकाळी ९ वाजता ही बस सुटणार असून, बुकींगकरिता ९८५०५०१८६२ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.












