न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १३ जानेवारी २०२५) :- पिंपरी विधानसभेतील जवळपास ७७ रेशन दुकानदारांनी आ. अण्णा बनसोडे यांची नुकतीच भेट घेतली. त्यांच्यासमोर समस्यांचा पाढा वाचला. त्याचबरोबर अनेक वर्षापासून थकीत असलेले कमिशन मिळावे, अशी मागणी केली.
यावेळी ऑल महाराष्ट्र फेअर प्राईज शॉप कीपर्स फेडरेशनचे पदाधिकारी आणि खजिनदार विजय गुप्ता आदी उपस्थित होते.
रेशन दुकादारांना धान्य वाटपात येणाऱ्या अडचणी, तसेच शासनाचे वारंवार बंद पडणारे सर्व्हर, वेळेवर न होणारा धान्याचा पुरवठा आदी विषयांवर आ. बनसोडे यांच्याशी दुकानदारांनी सविस्तर चर्चा केली.
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी चर्चा करून योग्य तो निर्णय घेतला जाईल. कमिशनच्या बाबतीत एफडीओ यांच्याशी आ. बनसोडे यांनी संपर्क साधला. पुढच्या महिन्यापासून वेळेवर धान्य दुकानदारांपर्यंत वितरीत होईल, असे आश्वासन आ. बनसोडे यांनी रेशन दुकानदारांना दिले आहे.
















