न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १३ जानेवारी २०२५) :- वाढत्या चैन चोरीच्या पार्श्वभूमीवर गुन्हे शाखेकडील पथक व युनिट हे चैन चोरीच्या गुन्हयांचा संमातर तपास करीत होते. मालमत्ता गुन्हे विरोधी पथक चैन चोरीच्या घटनास्थळी भेटी देवुन, अनेक सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करुन, रेकॉर्डवरील गुन्हेगार चेक करीत होते. पथकास रेकॉर्डवरील आरोपी आकाश वजीर नानावत व त्याचे इतर तीन नातेवाईक यांचा चैन स्नॅचिंग गुन्हयात सहभाग असल्याची खात्रलायक बातमी मिळाली.
त्यावर आरोपी आकाश वजीर राठोड वय २४ वर्षे रा. मुळशी, जि. पुणे. यास एमआयडीसी भोसरी पोलीस स्टेशन येथील गुन्हयात अटक केली. त्याने त्याचे इतर तीन साथिदार त्यापैकी ०२ विधीसंघर्षीत बालक व एक पाहीजे आरोपी यांचेसह मिळुन रावेत, निगडी, चिखली आळंदी परीसरात चैन चोरी व चाकण परीसरात वाहन चोरीचे गुन्हे केल्याचे कबुल केले. त्यावर दोन विधी संघर्षित बालक यांना ताब्यात घेवुन त्याचे कडे अधिक चौकशी करता तब्बल नऊ गुन्हे उघडकीस आले आहेत.
गुन्हयातील चोरीस गेलेला एकुण ७,७४,८६०/- रु चे ८४ ग्रॅम ९८० मिली वजनाचे सोन्याचे दागिने व ०३ मोटार सायकल असा मुद्देमाल अटक आरोपी व विधी संघर्षीत बालक याचे कडुन हस्तगत करण्यात आला आहे. अटक आरोपी सध्या गुन्हयातील पोलीस कोठडीत असुन, अधिक तपास मालमत्ता विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय ढमाळ हे करीत आहेत. अटक आरोपी आकाश वजीर राठोड हा सराईत गुन्हेगार असुन त्याचेवर यापुर्वी २१ गुन्हे दाखल असल्याचे आढळुन आले आहे.
कामगिरी पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, पोलीस सह आयुक्त शशिकांत महावरकर, वसंत परदेशी, अपर पोलीस आयुक्त, संदीप डोईफोडे पोलीस उप- आयुक्त, गुन्हे, डॉ. विशाल हिरे, सहाय्यक पोलीस आयुक्त, गुन्हे १, यांच्या मार्गदर्शनाखाली मालमत्ता गुन्हे विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय ढमाळ, सहा पोलीस निरीक्षक अभिनय पवार, पोलीस उप निरीक्षक भरत गोसावी, पोलीस अंमलदार महेश खांडे, औदुंबर रोंगे, गणेश हिंगे, आशिष बनकर, राहूल खारगे, प्रविण कांबळे, नितीन लोखंडे, सोमनाथ मोरे, प्रशांत पाटील, पोहवा गडदे, पोना गणेश कोकणे, गणेश सावंत, विनोद वीर, सुमीत देवकर, बाबाराजे मुंडे, समीर रासकक, अमर कदम, हर्षद कदम, अमोल गोरे, मोहसीन आत्तार,, मारुती जायभाय यांनी केली आहे.
















