न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १४ जानेवारी २०२५) :-पिंपरी-चिंचवड लघुउद्योग संघटनेचे अध्यक्ष संदीप बेलसरे यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी बंगलोर आश्रम येथे श्री श्री रविशंकर गुरुदेव महाराज यांचे आशीर्वाद घेतले.
या प्रसंगी गुरुदेव यांना श्री विठ्ठल रुक्मिणी प्रतिमा व संतश्रेष्ठ तुकाराम महाराज पगडी, उपर्ण भेट देण्यात आले.
तसेच पिंपरी चिंचवड लघुउद्योग संघटनेच्या २०२५ दिनदर्शिकेचे प्रकाशन त्याच्या हस्ते करण्यात आले.
या कार्यक्रमास पिंपरी चिंचवड लघुउद्योग संघटनेचे अध्यक्ष संदिप बेलसरे, चाकण उद्योजक संघटनेचे अध्यक्ष जयदेव अक्कलकोटे, लघुउद्योग भारती पिंपरी चिंचवड अध्यक्ष रामामूर्ती थेवर , उद्योजक दत्तात्रय राठोडे, श्रेयांस चौधरी, ओंकार सावंत व अथर्व बेलसरे उपस्थित होते.
















