न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १६ जानेवारी २०२५) :- स्वतःच्या आईसोबत लव्ह अँड रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या चाळीस वर्षीय जहीरवर तरुणाचा राग होता. तसेच त्याने रिक्षा न दिल्याने हा राग अनावर झाला. त्यामुळे चोविस वर्षीय विशाल या तरुणाने आपल्या चार ते पाच साथीदारांसह झहीरला ठार मारण्याच्या उद्देशाने त्याच्यावर कोयत्याने हल्ला केला.
ही घटना मंगळवारी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास भोसरीतील लांडगेनगर येथील मोकळ्या मैदानात घडली. याप्रकरणी जाहीर याने विशाल या तरुणाच्या विरोधात भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद नोंदवली आहे.
पोलिसांनी विशालच्या विरोधात गुन्हा दाखल करीत त्याला बेड्या ठोकल्या आहेत. या घटनेचा तपास पोलीस उपनिरीक्षक मदेवाड हे करीत आहेत